Salil Kulkarni - Durdeshi Gela Baba - текст песни, слова, перевод, видео

Исполнитель: Salil Kulkarni

Название песни: Durdeshi Gela Baba

Дата добавления: 01.11.2026 | 17:54:08

Просмотров: 1

0 - текст верный

0 - текст неверный

Ознакомьтесь с текстом песни Salil Kulkarni - Durdeshi Gela Baba

दूरदेशी गेला बाबा
दूरदेशी गेला बाबा
गेली कामावर आई
दूरदेशी गेला बाबा
गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा
गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा
कसा चिमणासा जीव कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसंभर दमवला
कसा चिमणासा जीव कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसंभर दमवला
आता पुरे झोप सोन्या कुणी म्हणतच नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी
कोणी बोलायाला नाही कशी व्हावी कट्टी-बट्टी
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी
कोणी बोलायाला नाही कशी व्हावी कट्टी-बट्टी
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा
दिसे खिडकीमधून जग सारे दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
दिसे खिडकीमधून जग सारे दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा
दूरदेशी गेला बाबा
गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा